तुमच्या घरात मुलगी असेल तर मिळणार 1 लाख रुपये! लेक लाडकी योजनेला असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lek ladki yojana : मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे लेक लाडके योजना या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींची शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावे म्हणून वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलींना टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये दिले जात आहे.

👇👇👇👇

या योजनेसाठी तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका कडून या योजनेची माहिती घेण्यात यावी. तसेच या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे तुमचा अर्ज जमा करावा. सरकारने या योजना सुरू करण्याची मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे , व मुलींचा जन्मदर वाढवा तसेच मुलींच्या शिक्षणास चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी सरकारने लेकराची योजना राबवली आहे.

👇👇👇👇

या योजनेचे माध्यमातून जर तुमच्या घरातील मुलगी एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेले असेल तर त्या मुलीला अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये रक्कम मिळणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना देखील लाभ दिला जाणार आहे जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती साठी तुम्ही अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे संपर्क केला पाहिजे.lek ladki yojana

👇👇👇👇

या कुटुंबातील मुलींना मिळणार लाभ :-

लेक लाडकी योजनेला तुमच्याजवळ पिवळे / केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याजवळ पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या कुटुंबातील मुलींना जन्म झाल्या झाल्या पाच हजार रुपये, पहिलीत दाखला दिल्यानंतर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये, बारावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये, तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर एकूण 75 हजार रुपये मिळणार आहेत. अशाप्रकारे मुलींना टोटल एक लाख रुपये मिळणार आहे.

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे, नंतर जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखवा लाभार्थीच्या आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे तुम्हाला असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

योजनेसाठी अर्ज कोठे करावा :-

लेक लाडकी योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला, एक अर्ज दिला जाईल हा अर्ज मध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील, अशी सर्व तपशील भरून तुम्हाला हा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे अर्ज दिल्यानंतर तुम्हाला पोचपावती सुद्धा मिळणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!